महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'सुपर ३०', 'बाटला हाऊस'नंतर अभिनेत्री मृणाल ठाकूरची करण जोहरच्या वेबसीरिजमध्ये वर्णी - zoya akhtar

मृणाल ठाकूरने या वेबसीरिजच्या क्लॅपबोर्डचा एक फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. नेटफ्लिक्सवर ही वेबसीरिज दाखण्यात येणार आहे.

'सुपर ३०', 'बाटला हाऊस'नंतर अभिनेत्री मृणाल ठाकूरची करण जोहरच्या वेबसीरिजमध्ये वर्णी

By

Published : Oct 6, 2019, 3:16 PM IST

मुंबई -छोट्या पडद्यावरून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर हृतिक रोशन सोबत 'सुपर ३०' चित्रपटात झळकली होती. त्यानंतर जॉन अब्राहमसोबत 'बाटला हाऊस' चित्रपटातही तिने भूमिका साकारली होती. आता दिग्दर्शक करण जोहरच्या चित्रपटासाठीही तिची वर्णी लागली आहे. आगामी 'घोस्ट स्टोरीज' या वेबसीरिजमध्ये ती महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.

मृणाल ठाकूरने या वेबसीरिजच्या क्लॅपबोर्डचा एक फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. नेटफ्लिक्सवर ही वेबसीरिज दाखण्यात येणार आहे.

हेही वाचा -'तेजाज्ञा' करणार तुमचा नखशिखान्त मेकओवर

'घोस्ट स्टोरीज' वेबसीरिजनंतर मृणाल फरहान अख्तरसोबतही 'तुफान' चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय नेटफ्लिक्सच्या 'बाहुबली: बिफोर द बिगिनिंग' या चित्रपटातही ती भूमिका साकारणार आहे.

'घोस्ट स्टोरीज' या वेबसीरिजची निर्मिती जोया अख्तर, अनुराग कश्यप आणि दिवाकर हे करत आहेत.

हेही वाचा -सुशांत सिंग राजपूतची जॅकलिनसोबत धमाल, पाहा त्यांची 'ड्राईव्ह' ट्रीप

ABOUT THE AUTHOR

...view details