महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे '15 ऑगस्ट'नंतर पुन्हा एकत्र - MRUNMAYI DESHPANDE

मृण्मयी देशपांडे आणि राहुल पेठे ही '१५ ऑगस्ट' या चित्रपटाची जोडी पुन्हा एकदा झळकणार आहे...या चित्रपटाचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे...याचे दिग्दर्शन स्वतः मृण्मयी देशपांडे करणार आहे...

मृण्मयी देशपांडे आणि राहुल पेठे

By

Published : Apr 17, 2019, 9:43 PM IST


नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या '१५ ऑगस्ट' या मराठी चित्रपटात झळकलेली फ्रेश जोडी म्हणजे मृण्मयी देशपांडे आणि राहुल पेठे. ते आता पुन्हा एकदा एका नवीन सिनेमातून आपल्या भेटीला येणारेत. '१५ ऑगस्ट' हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाल्यानंतर त्यातील या दोघांच्या कामाचं फारच कौतुक झालं होतं. या चित्रपटाच्या यशानंतर, ही जोडी पुन्हा एकदा एका नव्या सिनेमात काम करताना दिसेल.

या सिनेमाचं नाव अद्याप समजू शकलं नसलं तरीही यात मृण्मयी एका 'ट्रॅव्हलर'च्या भूमिकेत दिसणार असल्याचे समजतंय. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः मृन्मयीनेच केलं आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर मृण्मयीचा नवा 'लूक' व्हायरल झाला होता. हा तिचा लूक कशासाठी याची सगळीकडे चर्चा सुरु असतानाच तिचा हा लूक याच सिनेमातील असल्याचं आता स्पष्ट झालंय.

राहुलची या सिनेमातली भूमिका अद्याप तरी गुलदस्त्यात आहे. राहुलने याआधी अनेक हिंदी, मराठी मालिकांमधून काम केले आहे. शिवाय 'मिस्टर अॅण्ड मिसेस सदाचारी', 'व्हेंटिलेटर', 'वक्रतुंड महाकाय' 'मुंबई मेरी जान' अशा अनेक गाजलेल्या सिनेमांद्वारे त्याने त्याचं अभिनय कौशल्य दाखवून दिलं आहे. त्यामुळे आता या दोघांची जोडी पुन्हा एकदा एकत्र आल्यावर सिल्व्हर स्क्रिनवर नक्की काय कमाल करून दाखवते ते येत्या काही दिवसात कळेलच.

ABOUT THE AUTHOR

...view details