समाज विघटन रूढी आणि परंपरांचं उच्चाटन करणाऱ्या मारबतची दखल आता मराठी चित्रपट सृष्टीने देखील घेतली आहे. राजकुमार मेंढा निर्मित आणि समीर आठल्ये दिग्दर्शित बकाल या चित्रपटाच पाहिलं गाणं आज नागपुरात रिलीज करण्यात आलं.
१३५ वर्षांची परंपरा असलेल्या मारबतच्या आशयावरील बकाल चित्रपटाचं संगीत अनावरण - Samir Athalye
अनिष्ठ रुढींचे उच्चाटन करणाऱ्या मारबतच्या आशयावरील चित्रपट आता मराठीत होतोय. समीर आठल्ये दिग्दर्शित बकाल या चित्रपटातील पाहिलं गाणं आज नागपुरात प्रदर्शित करण्यात आलं.
बकाल चित्रपटाचं संगीत प्रकाशन
वर्षाची परंपरा असलेल्या सांस्कृतिक वैभव लाभलेल्या मारबतीच्या आशयावर हा बकाल चित्रपट आहे. एकूणच मारबतीची वैशिष्ट्य आणि दैविक शक्तीवर आधारित संगीताच प्रकाशन पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,वनराई फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश गांधी आणि बकाल च्या संपूर्ण चमूच्या उपस्थितीत करणाऱ्यात आलं. जेष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
स्टंट बेस बकाल या चित्रपटाबद्दल अधिकची माहिती जाणून घेतली आहे आमची प्रतिनिधी मोनिका अक्केवार यांनी.