मुंबई -नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय वेबसीरिज 'सेक्रेड गेम्स'चे दुसरे पर्व प्रदर्शनासाठी सज्ज झाले आहे. अलिकडेच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला. नेहमीप्रमाणे गणेश गायतोंडे म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकीची दमदार झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली. तर, सैफचीही झलक चाहत्यांना सुखावून गेली. आता त्यांच्यासोबत आणखी एक मराठी अभिनेत्री देखील दिसणार आहे.
सेक्रेड गेम्सचे पहिले पर्व संपल्यानंतर चाहत्यांना या सीरिजच्या दुसऱ्या भागाची आतुरता होती. अनेकदा या सीरिजच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल झाले. मात्र, आता १५ ऑगस्टला ही सीरिज प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या सीरिजमध्ये नवाजुद्दीन आणि सैफसोबत अभिनेत्री स्मिता तांबे हिची वर्णी लागली आहे.