पूर्णिया - बिहारचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक मनीष वात्सल्य यांच्या 'स्कॉटलँड' चित्रपटाला ऑस्करच्या शर्यतीत स्थान मिळाले आहे. या चित्रपटाला आत्तापर्यंत ६२ पेक्षा अधिक आतंरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. आता 'ऑस्कर' पुरस्काराचेही नामांकन मिळाल्यामुळे मनीष वात्सल्य यांच्या सोबतच त्यांचा कुटुंबीयांचा आनंदही गगनात मावेनासा झाला आहे.
मनीष वात्सल्य यांना शुभेच्छा देण्यासाठी पूर्णिया शहरातील नागरिकांनी त्यांच्या घरी गर्दी केली होती. यावेळी मनीष आणि त्यांच्या कुटुंबीयांनी 'ई टीव्ही भारत'शी संवाद साधला.
हेही वाचा - 'गुड न्यूज'ने वर्षाचा शेवट गोड, दुसऱ्या दिवशी कमाईत इतकी वाढ
मनीष यांनी बॉलिवूडमध्ये २००६ साली दिग्दर्शनीय क्षेत्रात पदार्पण केले होते. कैलाश खेर यांच्या 'तेरी दिवानी' या म्यूझिक अल्बममधून त्यांना पहिला ब्रेक मिळाला होता. हा अल्बम मनीष यांच्या कारकिर्दिसाठी टर्निंग पॉईन्ट ठरला.