महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘शेड्स ऑफ साहो - चॅप्टर २’ प्रदर्शित, श्रद्धाचा कॉन्फिडन्ट अंदाज - prabhas

साहो हा चित्रपट अॅक्शन थ्रिलर असणार आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगु, आणि हिंदी भाषेत रिलीज केला जाईल.

साहो

By

Published : Mar 3, 2019, 2:36 PM IST

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज ३२ वा वाढदिवस आहे. याच दिवसाची खास भेट श्रद्धाने आपल्या चाहत्यांना दिली आहे. तिच्या आगामी साहो चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. अशात या चित्रपटाच्या मेकर्सने श्रद्धाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 'साहो' चित्रपटाचा दुसरा मेकिंग व्हिडिओ ‘शेड्स ऑफ साहो - चॅप्टर २’ सोशल मीडियावर शेअर केला आहे.


शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओत अनेक अॅक्शन सिन्स पाहायला मिळतात. यापूर्वी प्रभासच्या वाढदिवसादिवशी शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत प्रेक्षकांना श्रद्धाची झलक पाहायला मिळाली नसल्याने चाहत्यांची निराशा झाली होती. त्यामुळे आताचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. कारण यात हातात बंदूक घेतलेल्या श्रद्धाचा अतिशय स्टाईलिश आणि कॉन्फिडन्ट अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.


साहो हा चित्रपट अॅक्शन थ्रिलर असणार आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगु, आणि हिंदी भाषेत रिलीज केला जाईल. या चित्रपटातील स्टंट सिन हॉलिवूड दिग्दर्शक केनी बेट्स यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आले आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक हॉलिवूड चित्रपटांत स्टंट सिन्सची निर्मिती केली आहे. अशात श्रद्धाचा हा व्हिडिओ नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details