महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 11, 2021, 9:52 PM IST

ETV Bharat / sitara

कंगनाच्या 'थलायवी'ला थंड प्रतिसाद, पहिल्या दिवशीची कमाई 'बेलबॉटम'पेक्षा कमी

कंगना रणौतचा 'थलायवी' हा चित्रपट नुकताच रिलीज झाला. मात्र बॉक्स ऑफिसवर याला जेमतेम प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाहून जास्त कमाई अक्षय कुमारच्या बेलबॉटम या चित्रपटाने केली आहे.

कंगना रणौतचा 'थलायवी'
कंगना रणौतचा 'थलायवी'

हैदराबाद - अभिनेत्री कंगना रणौतचा 'थलायवी' चित्रपट 10 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. सुप्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेत्री आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या या बायोपिक चित्रपटाने पहिल्या दिवशी हिंदी पट्ट्यात 20-25 लाखांची कमाई केली. देशभरातील सर्व चित्रपटगृहे अद्याप खुली झालेली नाहीत ही बाबदेखील लक्षात घेण्यासारखी आहे.

बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, 'थलाईवी' चित्रपटाची कमाई इतर ठिकाणी खूप कमी होती. दिल्ली, यूपी आणि गुजरातच्या प्रेक्षकांनी चित्रपटाला चांगले योगदान दिले आहे. देशभर चित्रपटाने 1.25 कोटी रुपयांची कमाई केली. खरंतर या चित्रपटाने तामिळनाडूमध्ये चांगला व्यवसाय केला. 80 लाख रुपयांची कमाई या एका राज्यात झाली आहे. कंगनाचा हा चित्रपट 'लाबाम' या स्थानिक चित्रपटाला तीव्र स्पर्धा देत आहे.

कंगनाच्या 'थलायवी' ची तुलना अक्षय कुमारच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'बेल बॉटम' शी केली तर ती खूप कमी आहे. कंगनाच्या या चित्रपटाने 1.25 कोटींची कमाई केली, तर अक्षयच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी 2.75 कोटींचा व्यवसाय केला. याशिवाय तामिळ चित्रपटांच्या तुलनेत 'थलायवी' ने चेन्नईच्या काही भागात चांगला व्यवसाय केला आहे.

कंगनाचा 'थलायवी' तमिळनाडूत चांगला व्यवसाय करेल अशी अपेक्षा आहे. दाक्षिणात्य सिने आणि राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे हा चितच्रपट उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतात चालणार हे अपेक्षित आहे. मात्र कोरोना संसर्गामुळे अद्याप केरळमधील थिएटर्स बंद आहेत. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक ते तामिळनाडू पर्यंत 750-800 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्याचे वृत्त आहे. बॉक्स ऑफिसची कमाई कमी झालेली असली तरी सॅटेलाईट, डिजिटल आणि संगीत यांचे हक्क 85 कोटीहून अधिकला विकले गेले आहेत.

हेही वाचा - रितिका श्रोत्री आणि विनायक माळी यांचा युथफूल, कलरफूल आणि रोमँटिक कॉमेडी चित्रपट, ‘मॅड’

ABOUT THE AUTHOR

...view details