मुंबई -अभिनेता कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांचा बहुप्रतिक्षीत 'लव्ह आज कल' चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून उत्सुकता होती. शिवाय सारा आणि कार्तिक पहिल्यांदाच एकत्र चित्रपटात दिसणार असल्यामुळेही या चित्रपटाची आतुरता पाहायला मिळत होती. मात्र, ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर एकंदर प्रतिक्रिया पाहता, हा ट्रेलर संभ्रमात पाडणारा असा आहे.
'लव्ह आज कल' हा चित्रपट सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण यांच्या 'लव्ह आज कल' चित्रपटाचाच सिक्वेल आहे. सैफ अली खानची मुलगी असलेल्या सारा अली खानला या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत भूमिका साकारण्याची संधी मिळाली. साराने यापूर्वी 'केदारनाथ' आणि 'सिंबा' यांसारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची दमदार चुणूक दाखवली होती. मात्र, 'लव्ह आज कल'च्या ट्रेलरमध्ये तिच्या अभिनयाबाबत प्रेक्षक निराश झालेले दिसत आहेत.
हेही वाचा -''मलाला बायोपिक बनवणे सोपे नव्हते, अजूनही येतात जीवे मारण्याच्या धमक्या''