महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

लता मंगेशकर ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल.. प्रकृती स्थिर - Lata Mangeshkar admited in Beech Candy

लता मंगेशकर यांना छातीत दुखत असल्यामुळे काल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर आहे. लवकरच त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळू शकेल.

फोटो लता मंगेशकर यांच्या ट्विटरच्या सौजन्याने

By

Published : Nov 12, 2019, 12:45 PM IST

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून सुधारत असल्याचे सांगण्यात येते.

लता मंगेशकर यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या गायिका असल्यामुळे त्यांची फुफ्फुसांची क्षमता उत्तम आहे. त्यामुळे त्या लवकर बऱ्या होऊ शकतील. लवकरच त्यांना रुग्णालयातून सुट्टीदेखील मिळू शकेल, असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकटून समजते.

लता मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच त्यांच्या चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण पसरले आहे. मात्र प्रकृती सुधारत असल्याच्या बातमीमुळे समाधान व्यक्त केले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details