महाराष्ट्र

maharashtra

कोरोना व्हायरसच्या चुकीच्या बातम्यांपासून सावध रहा - प्रियंका चोप्रा

By

Published : Mar 17, 2020, 3:06 PM IST

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रार्दुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रियंका चोप्राने महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. या प्रसंगी चुकीच्या माहिती आणि सूचनांपासून सावध राहण्याचा सल्ला तिने दिलाय.

Priyanka Chopra
प्रियंका चोप्रा

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने युनिसेफला कोरोना व्हायरस संबंधी महत्त्वपूर्ण आणि प्रामाणिक तपशील सादर केला आहे. सध्या सुरू असलेल्या व्हायरसमुळे चुकीच्या सूचनांपासून सावध राहण्याचा सल्लाही दिलाय.

प्रियंकाने आपल्या ट्विटर हँडलवरुन आपल्या फॉलोअर्सना ही माहिती शेअर केली.

तिने लिहिलंय, ''या आरोग्य संकटाच्या वेळी चुकीच्या सूचनांमुळे भय आणि दहशत पसरु शकते आणि त्यामुळे आपण असुरक्षिक होऊ शकतो. म्हणून वस्तुस्थिती समजून घ्या आणि आपल्या कुटुंबियांचीही सुरक्षा राखा. याविषयी मुलांना कसे समजवावे याबद्दल युनिसेफच्या वेबसाईटवर जा.''

यापूर्वी प्रियंकाने एक व्हिडिओ शेअर केला होता. वेगवेगळ्या कार्यक्रमात नमस्ते केलेल्याचा हा कोलाज होता. यातून तिने कोरोनापासून सतर्क राहण्याचा सल्ला चाहत्यांना दिला होता.

कोरोना व्हायरसचा प्रभाव मनोरंजन क्षेत्रावर स्पष्टपणे दिसत आहे. अनेक सिनेमाचे रिलीज पुढे ढकलण्यात आले असून चित्रपटांचे आणि मालिकांचे शूटींगही रद्द करण्यात आली आहेत.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details