महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'सांस तो ले ले', 'खानदानी शफाखाना'मधील बादशाहच्या आवाजातील गाणं प्रदर्शित - दबंग -३

पंजाबी बोल असलेलं हे गाणं रॅपर बादशाहने गायले आहे. या गाण्यात सोनाक्षीच्या एकंदर पात्राची झलक पाहायला मिळते.

'सांस तो ले ले', 'खानदानी शफाखाना'मधील बादशाहच्या आवाजातील गाणं प्रदर्शित

By

Published : Jul 29, 2019, 11:08 PM IST

मुंबई -अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा 'खानदानी शफाखाना' या चित्रपटात एका आगळ्या वेगळ्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट २ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटातील नवं गाणं 'सांस तो लेले' हे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

सोनाक्षीने तिच्या ट्विटर अकाऊंटवर या गाण्याची लिंक शेअर केली आहे.

पंजाबी बोल असलेलं हे गाणं रॅपर बादशाहने गायले आहे.

या गाण्यात सोनाक्षीच्या एकंदर पात्राची झलक पाहायला मिळते.

बादशाहनेच या गाण्याला कंपोज केलं आहे.

'खानदानी शफाखाना' या चित्रपटात सोनाक्षी लैंगिक समस्यांवर समुपदेशन करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिल्पी दासगुप्ताने केले आहे. तर, भूषण कुमार, मृगदीप लांबा आणि महावीर जैन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

अक्षयसोबत 'मिशन मंगल'मध्येही झळकणार
सोनाक्षी अक्षय कुमार सोबत 'मिशन मंगल' चित्रपटातही झळकणार आहे. १५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

पुन्हा एकदा 'रज्जो'च्या भूमिकेत
सलमान खानसोबत 'दबंग -३' चित्रपटातुनही ती पुन्हा एकदा 'रज्जो'च्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details