मुंबई - अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित 'केसरी' चित्रपटाची प्रेक्षकांना बऱ्याच काळापासून उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरनेही ही उत्कंठा वाढवली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटतील पहिलं गाणं 'सानु केंहदी' प्रदर्शित झालं होतं. आता या चित्रपटातील दुसरं 'अज सिंग गरजेगा' हे गाणं उद्या म्हणजेच ५ मार्च रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या गाण्याला अक्षय कुमारचा आवाज लाभला आहे.
अक्षय कुमारच्या आवाजातील 'केसरी'चं गाणं उद्या होणार प्रदर्शित, पाहा झलक! - अक्षय
अक्षयने त्याच्या इन्स्टाग्रामवर या गाण्याची झलक असलेला एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो स्वत: हे गाणं गाताना दिसत आहे. हे गाणं अक्षयव्यतिरीक्त पंजाबी सिंग गायक 'जॅझी बी' याने गायलं आहे.
अक्षयने त्याच्या इन्स्टाग्रामवर या गाण्याची झलक असलेला एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो स्वत: हे गाणं गाताना दिसत आहे. हे गाणं अक्षयव्यतिरीक्त पंजाबी सिंग गायक 'जॅझी बी' याने गायलं आहे.
'केसरी' चित्रपटात त्या २१ शीख सैनिकांची कथा दाखविण्यात येणार आहे, ज्यांनी हार पत्करण्यापेक्षा लढून मृत्यूस सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आणि २१ शीख सैनिकांनी सुमारे १० हजार अफगाणांसोबत लढाई केली. अनुराग सिंग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. येत्या २१ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.