महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

पतौडी पॅलेसमध्ये करिना कपूरच्या वाढदिवसाचं ग्रँड सेलिब्रेशन - saif ali khan

करिनाच्या वाढदिवसानिमित्त सैफ अली खानने पतौडी पॅलेसमध्ये ग्रँड पार्टीचं आयोजन केलं आहे.

पतौडी पॅलेसमध्ये करिना कपूरच्या वाढदिवसाचं ग्रँड सेलिब्रेशन

By

Published : Sep 21, 2019, 9:50 AM IST

मुंबई -अभिनेत्री करिना कपूर खान म्हणजेच बॉलिवूडची 'बेबो' हिचा आज ३९ वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसाचं ग्रँड सेलिब्रेशन हे सैफ अली खानच्या पतौडी पॅलेसमध्ये करण्यात आलं. या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
करिश्मा कपूरने करिनाच्या बर्थडे सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणेच करिनाचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळतो.

तिच्या वाढदिवसानिमित्त सैफने पतौडी पॅलेसमध्ये ग्रँड पार्टीचं आयोजन केलं आहे. या पार्टीत तिच्या जवळच्या मित्र मैत्रीणींनी हजेरी लावली.

करिना कपूर सैफ अली खान
सेलिब्रेशन
करिना कपूर

डिझायनर मनिष मल्होत्रानेही करिनाचा फोटो शेअर करुन तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दलजित दोसांझनेही करिनाचा व्हिडिओ शेअर करुन तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

करिना लवकरच 'गुड न्यूज' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, दलजित दोसांझ आणि कियारा अडवाणी देखील भूमिका साकारणार आहेत. याशिवाय, करिना 'अंग्रेजी मीडियम'मध्येही इरफान खानसोबत पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details