मुंबई - रोमॅन्टिक चित्रपटांसाठी ओळखला जाणारा बॉलिवूडचा आघाडीचा दिग्दर्शक करण जोहर एका हॉररपटाच्या निर्मितीसाठी सज्ज झाला आहे. त्याच्या 'धर्मा प्रोडक्शन'अंतर्गत आजवर बऱ्याच सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. आता मात्र, तो लवकरच एक हॉरर चित्रपट तयार करणार आहे. या चित्रपटाची घोषणा त्याने सोशल मीडियावर केली आहे.
रोमॅन्टिक चित्रपटानंतर आता करण जोहरचा हॉररपट येणार, पाहा पोस्टर - vicky koushal
करण जोहरने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये या हॉररपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख मात्र त्याने जाहीर केली आहे.
करण जोहरने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये या हॉररपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख मात्र त्याने जाहीर केली आहे. १५ नोव्हेंबर २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याबाबत तो आणखी माहिती लवकरच शेअर करणार असल्याचे त्याने लिहिले आहे.
करण जोहरच्या या घोषणेनंतर लगेचच त्याच्या या आगामी चित्रपटात कोणत्या कलाकारांची वर्णी लागणार याची चर्चा सुरू झाली आहे. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटात विकी कौशल आणि भूमी पेडणेकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती विकी किंवा भूमीने दिलेली नाही. विकीने काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक शंशाक खेतानसोबत एक हॉरर चित्रपट साकारणार असल्याचे एका पोस्टद्वारे सांगितले होते. तसेच करण जोहरनेही त्याच्या या पोस्टमध्ये शशांक खेतानला टॅग केले आहे. त्यामुळे ते एकत्र येऊन या चित्रपटाची निर्मिती करणार का, असा अंदाज लावला जात आहे.