महाराष्ट्र

maharashtra

कंगना महिला सशक्तीकरणाचे उत्तम उदाहरण - अनुपम खेर

कंगना ही आवडती अभिनेत्री असून तिला भेटून आनंद होत असल्याचे अनुपम खेर यांनी म्हटले आहे. ती महिला सशक्तीकरणाचे उत्तम उदाहरण असल्याचेही खेर यांनी म्हटलंय.

By

Published : May 28, 2019, 11:37 PM IST

Published : May 28, 2019, 11:37 PM IST

कंगना आणि अनुपम खेर


मुंबई - अभिनेता अनुपम खेर सोशल मीडियात नेहमी सक्रिय असतात. आपल्या कॉमेंट्समुळे ते नेहमी चर्चेत तर कधी वादात राहतात. दुसऱ्या बाजूला कंगना रानावत नेहमी इतर कलाकारांवर निशाणा साधत प्रसिध्दीत राहते. तिने केलेली राजकीय विधानेही चर्चेचा विषय असतात. अशा या कंगनाला अनुपम खेर महिला सशक्तीकरणाचे उत्तम उदाहरण असल्याचे म्हणातात.

कंगना आणि अनुपम खेर

अनुपम खेर यांनी अलिकडेच कंगनासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. कंगना आपली आवडती अभिनेत्री असून तिला भेटून आनंद होतो, असेही खेर यांनी म्हटलंय.

या फोटोत कंगना पांढऱ्या रंगाच्या कपड्यात दिसून येत आहे. तर अनुपम खेर पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि डेनीम जीन्समध्ये दिसत आहेत.

विशेष म्हणजे मणिकर्णिका चित्रपटानंतर बॉलिवूड तारे तारकांवर कंगना भडकली होती. यावेळी तिने आलिया भट्टवरही हल्ला बोल केला होता. यावेळी अनुपम खेर कंगनाच्या पाठीशी ठाम राहिले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details