मुंबई -अभिनेता शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी यांची जोडी असलेला 'कबिर सिंग' हा चित्रपट २१ जूनला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून उत्सुकता आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि ३ गाणे आत्तापर्यंत प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत. आता या चित्रपटाचं नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.
कियाराच्या निरागसतेवर भाळले प्रेक्षक, पाहा कबिर सिंगचं नवं गाणं - arjun reddy
'कबिर सिंग' हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट 'अर्जुन रेड्डी'चा रिमेक आहे. संदीप वांगा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात शाहिद कपूरची आगळी वेगळी भूमिका पाहायला मिळणार आहे.
मनोज मुंताशिर यांनी लिहलेलं 'कैसे हुआ' हे गाणं अलिकडेच प्रदर्शित झालं. या गाण्याला विशाल मिश्रा यांनी आपला आवाज दिला आहे. या गाण्यामध्ये शाहिद आणि किआराची रोमॅन्टिक केमेस्ट्री पाहायला मिळतेय. चाहत्यांनी किआराच्या साध्या आणि निरागस लूकवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
'कबिर सिंग' हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट 'अर्जुन रेड्डी'चा रिमेक आहे. संदीप वांगा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात शाहिद कपूरची आगळी वेगळी भूमिका पाहायला मिळणार आहे. एका वैद्यकिय विद्यार्थ्याच्या भूमिकेतील त्याचे तीन वेगवेगळे लूक या चित्रपटात पाहायला मिळतील.