महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 11, 2020, 8:55 AM IST

ETV Bharat / sitara

'सत्यमेव जयते'मध्ये जॉन अब्राहम साकारणार तिहेरी भूमिका?

काही दिवसांपासून जॉन अब्राहम या चित्रपटात दुहेरी नाही तर, चक्क तिहेरी भूमिकेत दिसणार असल्याची शक्यता असल्याची चर्चा रंगली होती. यावर जॉनने आपले मत स्पष्ट केलं आहे.

John Abraham Role in Satyameva Jayate 2, Satyameva Jayate 2 Film news, Satyameva Jayate 2 latest news, John Abraham news, सत्यमेव जयते' चित्रपट
'सत्यमेव जयते'मध्ये जॉन अब्राहम साकारणार तिहेरी भूमिका?

मुंबई -अभिनेता जॉन अब्राहमची भूमिका असलेला 'सत्यमेव जयते' या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे सध्या शूटिंग सुरू आहे. पहिल्या भागाच्या यशानंतर निर्मात्यांनी या चित्रपटाचा दुसरा भाग तयार करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, काही दिवसांपासून जॉन अब्राहम या चित्रपटात दुहेरी नाही तर, चक्क तिहेरी भूमिकेत दिसणार असल्याची शक्यता असल्याची चर्चा रंगली होती. यावर जॉनने आपले मत स्पष्ट केलं आहे.

एका माध्यमाच्या मुलाखतीत जॉनने याबाबत सांगितले, की 'हा चित्रपट पहिल्या भागापेक्षा फार वेगळ्या रुपात प्रदर्शित केला जाणार आहे. पहिला चित्रपट हा खूप मोठा प्रेक्षकवर्ग असणाऱ्यांसाठी होता. मात्र, यावेळी काही महत्वांच्या मुद्यांवर प्रकाश टाकत विशेष व्यक्तींपर्यंत हा चित्रपट पोहचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे'

तिहेरी भूमिकेबाबत तो म्हणाला, की 'या चित्रपटाचे दिग्दर्शक मिलाप झवेरी अद्याप काही पात्रांवर काम करत आहेत. मी इतरही भूमिकेमध्ये दिसू शकतो. मात्र, यावर कोणताही शिक्कामोर्तब झाला नाही. ज्यावेळी असे काही असेल, त्यावेळी त्याची घोषणा केली जाईल.
'सत्यमेव जयते' हा चित्रपट गांधी जयंती म्हणजे २ ऑक्टोंबरला प्रदर्शित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details