दिल्ली -जया प्रदा रामपूरमधून आझम खान यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अलिकडेच आझम खान यांनी जयाप्रदा यांच्याबद्दल आक्षेपार्ह्य वक्तव्य केले होते. आता आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला यांनीही जया प्रदा यांना 'अनारकली' म्हटले आहे. त्यामुळे जयाप्रदा यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
'आम्रपाली' की 'अनारकली', दोघांनी एकच काय ते ठरवा, जयाप्रदांचा तीव्र संताप - rampur election
अलिकडेच आझम खान यांनी जयाप्रदा यांच्याबद्दल आक्षेपार्ह्य वक्तव्य केले होते. आता आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला यांनीही जया प्रदा यांना 'अनारकली' म्हटले आहे.
'आम्रपाली' की 'अनारकली', दोघांनी एकच काय ते ठरवा, जयाप्रदांचा तीव्र संताप
'बाप तसा मुलगा'. दोघांच्याही वक्तव्यावर हसावे की रडावे हे समजत नाही. वडील 'आम्रपाली' म्हणून उल्लेख करतात. तर, मुलगा 'अनारकली' असं नाव ठेवतो. दोघांनी एकदाच ठरवावं. अब्दुल्ला कडून हे अपेक्षित नव्हते. तो एक सुशिक्षित व्यक्ती आहे. महिलांकडे पाहण्याचा हाच तुमचा दृष्टीकोन आहे का? असा प्रश्नही जयाप्रदा यांनी उपस्थित केला आहे.