मुंबई- 'माझ्या नवऱ्याची बायको' या प्रसिद्ध मराठी मालिकेतून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री म्हणजेच शनाया उर्फ ईशा केसकरच्या रिलेशनशिपला २ वर्ष पूर्ण झाली आहेत. ईशाने बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. यासोबतच फोटोला खास कॅप्शनही दिलं आहे.
ईशा केसकरच्या रिलेशनशिपला २ वर्ष; पोस्ट करत म्हणते, लग्नाचं विचारू नका - शनाया
आपला फोटो पोस्ट करत, तिने नात्याला दोन वर्ष पूर्ण झाल्याचं सांगितलं आहे. २ वर्षांपूर्वी या मुलानं अखेर मला डेट करायला सहमती दिली. अजून अशी खूप वर्ष आपल्या आयुष्यात येवो, असं तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे
बॉयफ्रेंड आणि अभिनेता रिशी सक्सेनासोबतचा आपला फोटो पोस्ट करत, तिने नात्याला दोन वर्ष पूर्ण झाल्याचं सांगितलं आहे. २ वर्षांपूर्वी या मुलानं अखेर मला डेट करायला सहमती दिली. अजून अशी खूप वर्ष आपल्या आयुष्यात येवो, असं तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तर यासोबतच लग्न कधी? हा प्रश्न कृपा करून विचारू नका, असंही ती म्हटली आहे.
ईशा सध्या 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील आपल्या रोलमुळे चांगलीच चर्चेत आहे. तर याशिवाय नुकतंच प्रदर्शित झालेल्या गर्लफ्रेंड चित्रपटातही तिनं भूमिका साकारली आहे. उपेंद्र सिंधये यांचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा २६ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस आला.