मुंबई -बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा 'वॉर' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अवघ्या ७ दिवसात या चित्रपटाने २०० कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटात दोघांच्याही अॅक्शनप्रमाणेच त्यांच्या फिटनेसचीही क्रेझ पाहायला मिळाली. मात्र, ही फिटनेस साकारण्यासाठी पडद्यामागे त्यांनी साकारलेली मेहनत पाहुन तुम्हीही थक्क व्हाल.
आपल्या भूमिकेला पडद्यावर जिवंत करण्यासाठी कलाकार आपल्या अभिनयासोबतच आपल्या लूक्सकडे लक्ष देत असतात. 'वॉर' चित्रपटातही टायगरच्या तोडीस तोड दिसण्यासाठी हृतिकलाही बरीच मेहनत घ्यावी लागली. खरंतर या चित्रपटापूर्वीच त्याचा 'सुपर ३०' चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तो थोडा स्थुल दिसला होता. आनंद कुमारांच्या लूकसाठी त्याला वजनही घटवावे लागले होते. मात्र, 'वॉर' चित्रपटात त्याचा लूक एकदम फिट पाहायला मिळाला.
हेही वाचा -बॉलिवूडचे सर्व विक्रम मागे टाकत 'वॉर' सिनेमाने रचला नवा इतिहास