महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मुलाच्या ११ व्या वाढदिवसानिमित्त भावुक झाले ह्रतिक-सुझान, सोशल मीडियावर शेअर केली भावनिक पोस्ट - social media

१ मे रोजी ह्रतिकचा मुलगा ह्रेदान यांचा वाढदिवस होता. ह्रतिकने त्याचा एक व्हिडिओ शेअर करत त्यावर खास कॅप्शनही दिले आहेत.

मुलाच्या ११ व्या वाढदिवसानिमित्त भावुक झाले ह्रतिक-सुझान

By

Published : May 2, 2019, 4:54 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा 'हॅन्डसम हंक' ह्रतिक रोशन आणि सुझान यांचा मुलगा ऱ्हेदान याचा ११ वा वाढदिवस आहे. ह्रतिक आणि सुझान यांचा जरी घटस्फोट झाला असला, तरी दोघेही एकमेकांचे खूप चांगले आणि जवळचे मित्र आहेत. दोघेही अनेकदा आपल्या मुलांबरोबर एकत्र वेळ घालवतात. आज त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त देखील दोघांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केले आहेत.

मुलाच्या ११ व्या वाढदिवसानिमित्त भावुक झाले ह्रतिक-सुझान

१ मे रोजी ह्रतिकचा मुलगा ह्रेदान यांचा वाढदिवस होता. ह्रतिकने त्याचा एक व्हिडिओ शेअर करत त्यावर खास कॅप्शनही दिले आहेत. 'आयुष्यात नेहमी नवीन काहीतरी कर, गर्दीच्या मागे नको धावु, स्वत:चा रस्ता तयार कर. कधीही स्वत:ची तुलना दुसऱ्यांशी करू नको. नेहमी आपल्या ध्येय्यावर ठाम राहा, त्यासाठी मनापासून प्रयत्न कर', असे लिहून त्याने ह्रेदानला शुभेच्छा दिल्या आहेत.

मुलाच्या ११ व्या वाढदिवसानिमित्त भावुक झाले ह्रतिक-सुझान

सुझानने देखील एक खास व्हिडिओ शेअर करत मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ह्रतिक आणि सुझैनने दिलेल्या या शुभेच्छांवर चाहत्यांनीही प्रतिक्रीया दिल्या आहेत.

मुलाच्या ११ व्या वाढदिवसानिमित्त भावुक झाले ह्रतिक-सुझान

ABOUT THE AUTHOR

...view details