महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

हृतिकला हॉलिवूडचे वेध, 'या' एजंसीसोबत करणार काम - हृतिक रोशनचे आगामी चित्रपट

हृतिक रोशन हॉलिवूडपट साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. आपल्या अ‌ॅक्शनचा जलवा तो आता हॉलिवूड चित्रपटातही दाखवणार आहे.

Hritik Roshan Aims Hollywood, Signs with us based talent Agency
हृतिकला हॉलिवूडचे वेध, 'या' एजंसीसोबत करणार काम

By

Published : Feb 29, 2020, 12:39 PM IST

लॉस एंजेलिस -'हँडसम हंक' हृतिक रोशनने बॉलिवूडमध्ये आपल्या डान्स आणि अभिनयामुळे तुफान लोकप्रियता मिळवली आहे. देशातच नाही, तर जगभरात त्याचे चाहते आहेत. आता त्याला हॉलिवूडचे वेध लागले आहेत. लवकरच तो हॉलिवूडच्या एका चित्रपटात झळकणार आहे. यासाठी त्याला 'ग्रेश' या एजन्सीने साईन केले आहे.

होय, हृतिक रोशन हॉलिवूडपट साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. आपल्या अ‌ॅक्शनचा जलवा तो आता हॉलिवूड चित्रपटातही दाखवणार आहे. 'ग्रेश' ही अशी एजन्सी आहे ज्यातून क्रिस्टन स्टीवर्ट, जे. के. सिमन्स आणि अ‌ॅडम ड्रायव्हर यांसारखे सुप्रसिद्ध हॉलिवूड कलाकार समोर आले आहेत. आता ग्रेश ही एजंसी हृतिक रोशनच्या KWAN शी मिळून आगामी हॉलिवूड चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

हेही वाचा -जिंकण हेच धेय्य! सुबोध भावेच्या 'विजेता' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

हृतिक रोशनची मॅनेजर अमृता सेनने याविषयी सांगितले, की 'मागच्या २० वर्षांपासून हृतिकने भारतीय सिनेसृष्टीत नेहमीच नवे जॉनर, नवे कथानक आणि स्टोरी टेलिंग यांना प्राधान्य दिले आहे. तो नेहमीच काहीतरी वेगळे करण्याच्या शोधात असतो. त्यामुळे जागतिक स्तरावरही त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे'.

हृतिकने २००० साली 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पहिल्याच चित्रपटातून तो स्टार झाला होता. त्यानंतर त्याने 'फिजा', 'मिशन कश्मीर', 'कोई मिल गया', 'धूम २', 'जोधा अकबर', 'गुजारिश', 'जिंदगी ना मिलेगी दोबारा', 'क्रिश', 'अग्नीपथ' यांसारख्या बऱ्याच चित्रपटात भूमिका साकारल्या.

हेही वाचा -'थप्पड' बॉक्स ऑफिस कलेक्शन : जाणून घ्या पहिल्या दिवशीची कमाई

मागच्या वर्षी त्याचे 'सुपर ३०' आणि 'वॉर' हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळवले. तसेच आगामी 'क्रिश ४' या चित्रपटाच्या तयारीला तो लागला आहे.

आता हॉलिवूडमध्ये हृतिक काय कमाल दाखवतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details