महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'छम्मो'च्या तालावर थिरकली 'हाऊसफुल ४'ची टीम, पाहा धमाल गाणं - housefull 4 release date

अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, क्रिती सेनॉन, क्रिती खरबंदा, पुजा हेगडे, हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. 'छम्मो' गाण्यात या सर्व कलाकारांचा धमाल डान्स पाहायला मिळतो.

'छम्मो'च्या तालावर थिरकली 'हाऊसफुल ४'ची टीम, पाहा धमाल गाणं

By

Published : Oct 22, 2019, 7:55 AM IST

मुंबई - मल्टीस्टारर 'हाऊसफुल ४' चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. धमाल ट्रेलरनंतर आत्तापर्यंत या चित्रपटातील ३ गाणी प्रदर्शित झाली आहेत. यापैकी 'बाला' गाण्याची क्रेझ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळते. अशातच आता या चित्रपटातील 'छम्मो' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. अक्षयने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर या गाण्याची लिंक शेअर केली आहे.

अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, क्रिती सेनॉन, क्रिती खरबंदा, पुजा हेगडे, हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. 'छम्मो' गाण्यात या सर्व कलाकारांचा धमाल डान्स पाहायला मिळतो. या गाण्याचं शूटिंग भव्यदिव्य अशा सीतमगड येथील राजवाड्यात करण्यात आलं आहे.

हेही वाचा -'बाहुबली' ठरला लंडनच्या 'रॉयल अल्बर्ट हॉल'मध्ये प्रदर्शित होणारा पहिला नॉन-इंग्लिश चित्रपट


समीर अंजान यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. तर, सौहेल सेन, सुखविंदर सिंग, श्रेया घोषाल आणि शादाब फरीदी यांनी हे गाणं गायलं आहे.

चित्रपटाची संपुर्ण टीम सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. प्रमोशनसाठी सध्या ही टीम वेगवेगळ्या ठिकाणी हजेरी लावत आहे. २५ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -'हाऊसफुल ४'च्या टीमची रेल्वेमध्ये धमाल, अक्षयने मानले रेल्वे प्रशासनाचे आभार

ABOUT THE AUTHOR

...view details