मुंबई -बॉलिवूडची लोकप्रिय जोडी म्हणून किंग खान शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी खानची ओळख आहे. दोघेही एक 'कपल गोल' मानले जातात. आपल्या आवडीच्या कलाकारांची लाईफस्टाईल, त्यांच्या घराचे फोटो जर चाहत्यांना पाहायला मिळाले तर ही त्यांच्यासाठी आनंदाची पर्वणीच म्हणावी लागले. गौरीने त्यांच्या आलिशान 'मन्नत' बंगल्यामध्ये प्रसिद्ध मॅगझीन 'वोग'साठी फोटोशूट केले आहेत. यामधील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी चाहते त्याच्या आलिशान 'मन्नत' बंगल्यासमोर वाट पाहत असतात. त्याच्या याच 'मन्नत'चे यापूर्वी कधीही समोर न आलेले फोटो गौरीने शेअर केले आहेत.