मुंबई- तगडी स्टारकास्ट असलेल्या 'कलंक' चित्रपटाची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत. अशात काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील कलाकारांचे फर्स्ट लूक शेअर करण्यात आले होते. आता चित्रपटातील आणखी काही खास फोटो प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
'कलंक'ची नवी झलक, उद्या टीझर होणार प्रदर्शित
चित्रपटात वरूण धवन, आदित्य रॉय कपूर, आलिया भट्ट, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा आणि संजय दत्त या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. १७ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
कलंक
या फोटोमध्ये सर्वच कलाकार पाठमोरे उभे आहेत. यातील दृश्यांतून १९४० चा काळ दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या फोटोसोबतच चित्रपटाच्या टीझरबद्दलही माहिती देण्यात आली आहे. मंगळवारी या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
चित्रपटात वरूण धवन, आदित्य रॉय कपूर, आलिया भट्ट, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा आणि संजय दत्त या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. १७ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.