मुंबई -प्रसिद्ध नाटककार, ज्येष्ठ अभिनेते, लेखक गिरीश कर्नाड यांचे सोमवारी (१० जून) सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. बंगळुरु येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८१ वर्षांचे होते.
गिरीश यांचा जन्म १९ मे १९३८ साली माथेरान येथे झाला होता. त्यांचे शिक्षण पुणे येथे झाले आहे. पुढे त्यांनी नाट्यक्षेत्रात स्वत:ला झोकून दिले. त्यांच्या नाटकांनी भारतासह विदेशातही बरेच नाव कमावले आहे.
गिरीश यांनी लिहिलेले 'युवती' (१९६१) हे पहिले नाटक होते. त्यांनतर त्यांचे 'तुघलक' (१९६४) हे नाटक देखील गाजले होते. त्यांनी बऱ्याच नाटकांचे लिखाणही केले आहे. त्यांनी १९७० मध्ये कन्नड चित्रपट 'संस्कार' मधून चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले होते. चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्यांनी 'वंशवृक्ष' चित्रपटाद्वारे सुरुवात केली. या चित्रपटाला बरेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.