महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'बाजीगर' चित्रपटातील शाहरुखचा 'हा' लूक गौरीने केला होता डिझाईन, आठवणीला दिला उजाळा - ये काली काली आँखे song

शाहरुखच्या करिअरमध्ये 'बाजीगर' हा चित्रपट महत्वपूर्ण ठरला होता. या चित्रपटातील एका लूकचं डिझाईन गौरीने केला होता.

'बाजीगर' चित्रपटातील शाहरुखचा 'हा' लूक गौरीने केला होता डिझाईन, आठवणीला दिला उजाळा

By

Published : Sep 12, 2019, 9:00 PM IST

मुंबई -शाहरुख आणि काजोलची जोडी असलेला 'बाजीगर' हा चित्रपट ९० च्या दशकात तुफान हिट झाला होता. या चित्रपटातील गाण्यांनीही प्रेक्षकांना भूरळ पाडली होती. विशेष म्हणजे 'ये काली काली आँखे' हे गाणं आजही लोकप्रिय आहे. या गाण्यात शाहरुखचा हटके लूक पाहायला मिळाला होता. हा लूक शाहरुखची पत्नी गौरीने डिझाईन केला होता. गौरीनेच एक फोटो शेअर करुन या चित्रपटाच्या आठवणीला उजाळा दिला आहे.

शाहरुख आणि गौरी दोघांची जोडी बॉलिवूडचं पॉवर कपल मानलं जातं. या दोघांच्या जोडीची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात आहे. दोघांचेही बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. शाहरुखच्या करिअरमध्ये 'बाजीगर' हा चित्रपट महत्वपूर्ण ठरला होता.

हेही वाचा-लालबागच्या दर्शनाला गेलेल्या स्वराची चप्पल चोरीला

या चित्रपटातील शाहरुख आणि काजोलची केमेस्ट्री असलेलं 'ये काली काली आँखे' गाण्यात शाहरुखच्या लूकनेही प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं.

हेही वाचा-'बागी ३' च्या शूटिंगला सुरुवात, टीमने शेअर केले फोटो

ABOUT THE AUTHOR

...view details