महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'द स्काय ईझ पिंक'चं पहिलं पोस्टर प्रदर्शित, ट्रेलरही लवकरच येणार भेटीला - zaira wasim

'द स्काय ईझ पिंक' या चित्रपटाची मागच्या वर्षीच शूटिंग सुरू झाली होती. प्रियांका आणि फरहानने अलिकडेच या चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत.

'द स्काय ईझ पिंक'चं पहिलं पोस्टर प्रदर्शित, ट्रेलरही लवकरच येणार भेटीला

By

Published : Sep 9, 2019, 11:56 AM IST

मुंबई - प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर, झायरा वसिम यांची प्रमुख भूमिका असलेला ‘द स्काय इज पिंक’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनाली बोस दिग्दर्शित हा चित्रपट आयशा चौधरी हिच्या जीवनावर आणि तिनं लिहिलेल्या ‘माय लिटिल एपिफेनिस’ या पुस्तकावर आधारित आहे. नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये सर्व कलाकरांची झलक पाहायला मिळते.

'द स्काय ईझ पिंक' या चित्रपटाची मागच्या वर्षीच शूटिंग सुरू झाली होती. प्रियांका आणि फरहानने अलिकडेच या चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत. 'द स्काय ईझ पिंक' सिनेमा अथक परिश्रमांशिवाय खूप साऱ्या प्रेमासोबतही बनवला गेला आहे', असं कॅप्शनही त्यांनी या फोटोंवर दिले आहे.

हा चित्रपट 'टोरान्टो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'मध्ये खूप सारं प्रेम आणि कौतुकाची थाप मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. लवकरच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित होणार असल्याचं फरहाननं म्हटलं आहे. उद्या म्हणजे १० सप्टेंबरला या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला जाऊ शकतो.

हेही वाचा-...जेव्हा 'द स्काय ईझ पिंक'च्या सेटवर प्रियांकानं निकला रडवलं होतं

'दंगल' चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री झायरा वसिम हिने अचानक चित्रपटक्षेत्रातून एक्झिट घेतल्यानंतर बरीच चर्चा झाली होती. मात्र, 'द स्काय ईझ पिंक' या चित्रपटात ती अखेरची पडद्यावर पाहयला मिळणार आहे. या चित्रपटाची 'टोरान्टो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल' मध्ये स्क्रिनिंग होणार आहे.

प्रियांका चोप्रादेखील लग्नानंतर पहिल्यांदाच या चित्रपटातून पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तर, फरहान अख्तर देखील त्याच्या आगामी 'तुफान' चित्रपटाची तयारी करत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.

हेही वाचा-फरहान-प्रियांकाची रोमँट्रीक केमिस्ट्री; पाहा, द स्काय इज पिंकमधील फोटो

ABOUT THE AUTHOR

...view details