मुंबई- बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी आणि दिया मिर्झा यांच्या आगामी 'शीर कुर्मा' या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आलंय. फराज अरीफ अन्सारी यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती मारिजके डिसुझा यांची आहे. या चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा करण्यात आली होती. समलैंगिकता या विषयावर आधारित या चित्रपटाची कथा आहे.
समलैंगिकता विषयावरील 'शीर कुर्मा' चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित - Shabana Azami latest news
'शीर कुर्मा' या चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा करण्यात आली होती. समलैंगिकता या विषयावर आधारित या चित्रपटाची कथा आहे.
आत्तापर्यंत बॉलिवूडमध्ये समलैंगिकतेवर आधारित बरेच चित्रपट तयार झाले. या चित्रपटांचाही प्रभाव प्रेक्षकांवर दिसू लागला आहे. त्यामुळे अशा विषयांवर प्रकाश टाकण्यासाठी नवनव्या चित्रपटांची निर्मिती करण्यात येत आहे. त्यापैकीच एक 'शीर कुर्मा' आहे. या चित्रपटात अभिनेत्री स्वरा भास्कर आणि दिव्या दत्ता या मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तर, सुरेखा शिखरी यांचीही महत्वपूर्ण भूमिका राहणार आहे. दिग्दर्शक फराज अन्सारी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरूवात होणार आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.