महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सईचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, फर्स्ट लूक प्रदर्शित - sai tamhankar news

दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या आगामी 'कुलकर्णी चौकातला देशपांडे' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सईची मुख्य भूमिका आहे.

सईचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, फर्स्ट लूक प्रदर्शित

By

Published : Sep 30, 2019, 9:39 AM IST

मुंबई -अभिनेत्री सई ताम्हणकरने आजवर बऱ्याच मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. हिंदी सिनेसृष्टीतही तिने तिच्या दमदार अभिनयाची झलक दाखवून दिली आहे. अलिकडेच ती अमेय वाघसोबत 'गर्लफ्रेंड' चित्रपटात झळकली होती. आता पुन्हा एकदा ती एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूकही प्रदर्शित करण्यात आला आहे.

दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या आगामी 'कुलकर्णी चौकातला देशपांडे' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सईची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटातील तिचा लूक असलेला फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा -पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या रायच्या लूकची भूरळ, पाहा व्हिडिओ

या चित्रपटात सई ताम्हणकरसोबत राजेश श्रृंगारपूरे आणि निखिल रत्नपारखी हे देखील भूमिका साकारत आहेत.

स्मिता प्रोडक्शन अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. विनय गनू हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. २२ नोव्हेंबरला हा चित्रपट सिनेमागृहात झळकणार आहे.

हेही वाचा -शाहरुखच्या लेकीचा अभिनयात डेब्यू, पहिल्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

ABOUT THE AUTHOR

...view details