मुंबई -अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि अभिनेता पंकज त्रिपाठी दोघेही लवकरच पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. 'मला आई व्हायचंय' या मराठी चित्रपटावर आधारित 'मीमी' चित्रपटात दोघांची वर्णी लागली आहे. या चित्रपटाचं फर्स्ट पोस्टरही प्रदर्शित झालं आहे.
क्रिती सेनॉन काही दिवसांपूर्वीच 'अर्जुन पटियाला' चित्रपटात झळकली होती. तर, पंकज त्रिपाठी हा 'सेक्रेड गेम्स'मध्ये गुरूजीच्या भूमिकेत पाहायला मिळाला. आजवर दोघांनीही बऱ्याच चित्रपटांमध्ये भूमिका साकारली होती. मात्र, 'मीमी' चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच दोघेही एकत्र काम करणार आहेत.