महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'तुफान' चित्रपटासाठी फरहान घेतोय बॉक्सिंगचे धडे, पाहा फोटो - boxing

फरहान अख्तरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो बॉक्सिंगसाठी मेहनत घेताना दिसत आहे. 'तुफान'च्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी बॉक्सिंगसाठी फरहान प्रशिक्षण घेत आहे.

'तुफान' चित्रपटासाठी फरहान घेतोय बॉक्सिंगचे धडे, पाहा फोटो

By

Published : May 25, 2019, 8:11 PM IST

मुंबई - 'भाग मिल्खा भाग' चित्रपटानंतर पुन्हा एकदा फरहान अख्तर आणि दिग्दर्शक ओमप्रकाश मेहरा 'तुफान' या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. हा चित्रपट एका बॉक्सरवर आधारित आहे. फरहाननेच सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली होती. या चित्रपटासाठी सध्या तो बॉक्सिंगचे धडे घेत आहे.

फरहान अख्तरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो बॉक्सिंगसाठी मेहनत घेताना दिसत आहे. 'तुफान'च्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी बॉक्सिंगसाठी फरहान प्रशिक्षण घेत आहे.

'तुफान' चित्रपटासाठी फरहान घेतोय बॉक्सिंगचे धडे, पाहा फोटो

एका माध्यमाशी बोलताना दिग्दर्शक ओमप्रकाश मेहरा म्हणाले होते, की 'या चित्रपटासाठी मी फार उत्सुक आहे. 'भाग मिल्खा भाग'नंतर तब्बल ६ वर्षांनी मी आणि फरहान एकत्र आलो आहोत. दोघेही एकमेकांशी चित्रपटाबाबत वेगवेगळ्या कल्पना शेअर करत असतो'. या चित्रपटाच्या कथेवर अंजुम राजाबली हे सध्या काम करत आहेत. ही एका सामान्य बॉक्सरची कथा राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

फरहान अख्तर

फरहान सध्या त्याच्या आणि शिबानी दांडेकरच्या रिलेशनशिपमुळेही चर्चेत आहे. लवकरच ते लग्न करणार असल्याच्या चर्चादेखील कलाक्षेत्रात रंगलेल्या आहेत. दोघांनी अद्याप लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. तरीही त्यांच्या लग्नाची चाहत्यांना आतुरता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details