महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

ठरलं तर! 'या' दिवशी येणार 'तुफान', पाहा फरहान अख्तरची दमदार झलक - Farhan Akhtar news

फरहान अख्तर आणि दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा दोघेही या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल ६ वर्षांनी एकत्र येत आहेत. हा चित्रपट बॉक्सिंगवर आधारित आहे. हा बायोपिक नाही. मात्र, बॉक्सिंगपटूच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

ठरलं तर! 'या' दिवशी येणार 'तुफान', पाहा फरहान अख्तरची दमदार झलक

By

Published : Sep 30, 2019, 11:55 AM IST

मुंबई -बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर 'भाग मिल्खा भाग' या चित्रपटानंतर 'तुफान' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फरहान या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली आहे. पुढच्या वर्षी गांधी जयंतीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

फरहान अख्तर आणि दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा दोघेही या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल ६ वर्षांनी एकत्र येत आहेत. हा चित्रपट बॉक्सिंगवर आधारित आहे. हा बायोपिक नाही. मात्र, बॉक्सिंगपटूच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

हेही वाचा -जेनेलियाला सोडून मैत्रिणीशी बोलत होता रितेश... पाहा 'अशी' दिली रिअ‌ॅक्शन

या चित्रपटाची निर्मिती रितेश सिधवानी, राकेश ओमप्रकाश मेहरा आणि फरहान अख्तर हे करत आहेत. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाचं फर्स्टलूक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. २ ऑक्टोंबर २०२०ला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

हेही वाचा -विकी कौशलचा भाऊ सनी 'या' चित्रपटात मुख्य भूमिकेत, पोस्टर प्रदर्शित

फरहानचा 'द स्काय ईझ पिंक' हा चित्रपटदेखील सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि झायरा वसिम यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर तसंच गाणीदेखील चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. ११ ऑक्टोंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

हेही वाचा -सईचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, फर्स्ट लूक प्रदर्शित

ABOUT THE AUTHOR

...view details