मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीने पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानात चित्रपट प्रदर्शित करण्यास मज्जाव केला आहे. पाकिस्तानी कलाकारांना काम न देण्याचा निर्णयदेखील घेण्यात आलाय. राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री विद्या बालन हिनेदेखील कठोर पावली उचलायला हवीत अशी भूमिका घेतली आहे.
"कलेला राजकारण आणि देशांच्या सीमा यांच्यापासून वेगळे ठेवायला हवे या मताची मी आहे. मात्र सध्याची परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे दिसत असून कठोर पावले उचलली पाहिजेत," असे विद्या बालनने म्हटले आहे.
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान ठार झाले होते. वीरमरण पावलेल्या या जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी देशातील जनता ठाम राहिली आहे. सिनेक्षेत्राकडूनही उत्सफुर्त पाठींबा मिळालाय.