चंदीगढ - मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे अभिनेते म्हणजे विक्रम गोखले. अलिकडेच ते पंजाबमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी त्यांनी 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रंगभूमी आणि अभिनयाच्या अनुभवाबद्दल बरेच किस्से उलगडले.
रंगभूमीसाठी प्रत्येकाने मेहनतीने काम केले पाहीजे, असे ते यावेळी म्हणाले. रंगभूमी हा स्वतंत्र विषय आहे ज्यासाठी बरेच काम करण्याची आवश्यकता आहे. टीव्ही आणि नाटकांच्या स्क्रिप्टबाबत ते म्हणाले, की 'कथानक हे नाटकासाठी आहे की टीव्हीसाठी यावर आपला अभिनय अवलंबून असतो. मात्र, टीव्ही आणि नाटक दोघांच्याही स्क्रिप्टमध्ये फरक असतो.