मुंबई -बॉलिवूडची बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री दिशा पटाणी तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती बऱ्यापैकी सक्रिय असते. तिचे बरचसे व्हिडिओ आणि फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या ती तिच्या 'बॅकफ्लिप' व्हिडिओमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या व्हिडिओद्वारे पुन्हा एकदा तिने तिच्या फिटनेसची झलक दाखवून दिली आहे.
दिशाचा 'परफेक्ट बॅकफ्लिप' पाहिलात का?
दिशा अलिकडेच सलमान खानसोबत 'भारत' चित्रपटात झळकली होती. तिचे आणि सलमानचे 'स्लो मोशन' गाणे सोशल मीडियावर हिट झाले. आता ती आदित्य रॉय कपूरसोबत 'मलंग' चित्रपटात दिसणार आहे.
दिशाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती बॅकफ्लिप करताना दिसतेय. तिने सलग दोनवेळा हे बॅकफ्लिप केले आहे. याबाबत तिने लिहिलेय, की 'बॅकफ्लिप करण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. अजूनही मला यावर बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. पण, आता माझी भीती गेली आहे. प्रत्येक दिवस आपल्यात बदल घडवतोच'.
दिशा अलिकडेच सलमान खानसोबत 'भारत' चित्रपटात झळकली होती. तिचे आणि सलमानचे 'स्लो मोशन' गाणे सोशल मीडियावर हिट झाले. आता ती आदित्य रॉय कपूरसोबत 'मलंग' चित्रपटात दिसणार आहे. त्यासाठी ती बरीच मेहनत घेत आहे.