महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी शेताच्या बांधावर साजरा केला वडिलांचा वाढदिवस - प्रविण तरडे

दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी शेतात भातलावणी करीत आपली मातीशी असलेली नाळ घट्ट केली. यावेळी त्यांचे वडिल विठ्ठल तरडे यांचा 78 वा वाढदिवस बांधावर साजरा करण्यात आला. प्रविण यांनी ही माहिती फेसबुकवरुन चाहत्यांना दिली आहे.

Pravin Tarade
प्रविण तरडे

By

Published : Jun 27, 2020, 6:26 PM IST

'शेती विकायची नसते ती राखायची असते' असा संदेश आपल्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून देणारे अभिनेते, लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांची नाळ आजही आपल्या मातीशी जोडली आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. मुळशी तालुक्यातील जातेडे या त्यांच्या गावात आज त्यांनी वडील विठ्ठल तरडे, आई रुक्मिणी, पत्नी स्नेहल, बंधू योगेश तरडे आणि कुटुंबियांसमवेत भात लावणी केली. यावेळी त्यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातील अभिनेते रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, सुनील पालकर यांनीही हातभार लावला.

वडील विठ्ठल तरडे यांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त फेसबुकद्वारे आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना प्रविण तरडे म्हणाले की, सध्या लॉकडाऊनमुळे शेतात काम करायला मजूर मिळत नाहीत. यामुळे मी आपल्या कुटुंबियांसोबत शेतात भात लावणी करायला आलो आहे. तसेच कोरोनामुळे यंदा वारी झाली नाही यामुळे आई-वडील शेतात राबत आहेत, अन्यथा ते शेतातील कामं आटोपून वारीला निघालेले असतात. पुण्या-मुंबईत कामासाठी गेलेल्या प्रत्येकाने आपल्या मातीशी असलेले नाते कायम जपावे, असे सांगत आपलं शेत आपण कसलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

तसेच त्यांनी कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात शेतकरी ज्या पद्धतीने कष्ट करतो आहे त्याला सलाम केला. मराठीतील भव्यदिव्य असा ऐतिहासिक ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

ABOUT THE AUTHOR

...view details