मुंबई - छोट्या पडद्यावर 'बिग बॉस मराठी'च्या घरात दिवसेंदिवस स्पर्धकांमधील चुरस रंगताना दिसतेय. आता घरामध्ये नॉमिनेशन प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्याच नॉमिनेशनमध्ये मैथिली जावकर घराबाहेर पडली. आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर पडावे लागत आहे. या आठवड्यामध्ये दिगंबर नाईक यांना घराबाहेर पडावे लागले आहे.
या आठवड्यामध्ये नेहा शितोळे, विणा जगताप, किशोरी शहाणे, दिगंबर नाईक, माधव देवचके नॉमिनेशन होते. ज्यामध्ये अभिजीत बिचुकले आणि दिगंबर नाईक डेंजर झोनमध्ये गेले. महेश मांजरेकर यांनी घोषित केले की, या आठवड्यामध्ये दिंगबर नाईक यांना बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागणार आहे. आता येत्या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल? कोण घराचा नवा कॅप्टन बनेल? सदस्यांना कोणते टास्क मिळणार, हे बघणे रंजक असणार आहे.
कालच्या भागामध्ये विणा आणि अभिजीत बिचुकले यांचा वाद झाला. तर 'शाळा सुटली पाटी फुटली' या टास्क मध्ये झालेल्या वादावरून देखील चर्चा झाली. यामध्ये प्रत्येकाने आपली मतं मांडली. या टास्कवरून नेहाला भाषेवरून महेश मांजरेकर यांनी सांगितले प्रत्येक विभागातील भाषेचा मान ठेवूया. अभिजीत केळकर याने देखील सांगितले नेहा चुकीचा गेम खेळत होती. तर, सुरेखा, पराग, वैशाली, दिगंबर यांचे तास छान झाले असे महेश मांजरेकर यांनी सांगितले. तर विश्वचषक सामन्याबद्दल देखील चर्चा झाली. सुरेखा पुणेकर यांनी कडक शब्दांत बिचुकले यांना खडसावले. घरातील सदस्य इतके खुश झाले की, त्यांनी गाणे म्हटले 'ही सुरेखा आम्हांला पटलेली आहे'.