न्यूयॉर्क - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने सुपरमॉडेल आणि रियॅलिटी टीव्ही स्टार केंडल जेन्नर हिच्यासोबत फोटो काढला आहे. यात दोघीही हसताना दिसत आहेत. मानसिक आरोग्यासंबंधी जनजागृती मोहिमेत सक्रिय असलेली दीपिका न्यूयॉर्क प्रेसबाइटेरियन हॉस्पिटल द्वारा आयोजित एन्ग्जाइटी यूथ सेंटर डिनर कार्यक्रमात सहभागी झाली होती.
सेलेब्रिटी हेयरस्टाइलिस्ट गैब्रिएल जॉर्जियुने या दोघींचा फोटो शेअर केला आहे. यात दीपिकाने एल्बर्टा फेरेट्टी पँटसूट परिधान केला असून केंडल नारंगी रंगाच्या बॉडीकोन ड्रेसमध्ये दिसत आहे.