मुंबई -महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता यांच्या गायनाच्या आवडीबद्दल सर्वांना माहिती आहे. बऱ्याच कार्यक्रमांमधुन, अल्बममधुन त्यांचे गाण्याबद्दलचे प्रेम नेहमीच दिसून आले आहे. आता पुन्हा एकदा त्याचं नवं गाणं प्रदर्शित होणार आहे. या गाण्याच टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
मिसेस फडणवीसांचं नवं गाणं, ग्लॅमरस अंदाजात करणार सादर
अमृता यांचा हा पहिलाच अल्बम नाहीये. यापूर्वीही त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'फिर से' गाण्यात स्क्रिन शेअर केली आहे. हे गाणे देखील त्यांनीच गायले होते.
'कबिर सिंग' चित्रपटातलं 'मै तेरा बन जाऊंगा' हे गाणं अमृता फडणवीस गाणार आहेत. या गाण्यात त्यांचा ग्लॅमरस अंदाज देखील पाहायला मिळणार आहे. १५ सेकंदाचा असलेल्या या टीजरवर आत्तापर्यंत १ लाखापेक्षा जास्त व्हिव्ज मिळाले आहेत. हे संपूर्ण गाणं ५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.
अमृता यांचा हा पहिलाच अल्बम नाहीये. यापूर्वीही त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'फिर से' गाण्यात स्क्रिन शेअर केली आहे. हे गाणे देखील त्यांनीच गायले होते. या गाण्यात त्यांना डान्सही सादर केला होता. आता पुन्हा एकदा त्यांचं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.