मुंबई - जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त युनिसेफचे सेलिब्रेटी अॅडव्होकेट अभिनेता आयुष्मान खुराणा यांनी मुलांचे संरक्षण आणि सुरक्षित वातावरणात त्यांची वाढ होण्यासाठी भाष्य केले.
आयुष्मान म्हणाला, "हिंसाचार रोखला जाऊ शकतो आणि त्याला रोखले पाहिजे. आई वडिल, शिक्षक, समाजातील सदस्य आणि आपली स्वतःची जबाबदारी अशी आमची भूमिका आहे, ज्याचे आपण पालन केले पाहिजे. मुलांना हे समजावून सांगण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. ते आपल्या आई वडिलांना किंवा १०९८ वर कॉल करून त्यांच्यावर होत असलेल्या हिंसेबद्दल बोलू शकतात. ते स्वतःचे रक्षण करु शकतात हे त्यांना समजवण्यासाठी त्यांना मदत करणे गरजेचे आहे.