मुंबई -बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. मागच्या वर्षीच हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली. आता अखेर या चित्रपटाची तारीख ठरली आहे.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी 'ब्रह्मास्त्र'च्या टीमचा एक फोटो शेअर केला आहे. सोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेविषयी माहिती दिली आहे. ४ डिसेंबरला 'ब्रह्मास्त्र'चा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.