महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

श्रीदेवींच्या आठवणीत बोनी कपूर भावुक, शेअर केली पोस्ट - कमल हसन

श्रीदेवींची मुलगी जान्हवी तसेच अनिल कपूर यांनी देखील श्रीदेवींच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

श्रीदेवींच्या आठवणीत बोनी कपूर भावुक, शेअर केली पोस्ट

By

Published : Aug 13, 2019, 2:07 PM IST


मुंबई -अभिनेत्री श्रीदेवी यांचा आज ५६ वा जन्मदिवस आहे. त्यांच्या वाढदिवशी बोनी कपूर हे भावुक झालेले दिसले. श्रीदेवींची मुलगी जान्हवी तसेच अनिल कपूर यांनी देखील श्रीदेवींच्या आठवणींना उजाळा दिला आहे. बोनी कपूर यांनी श्रीदेवींच्या आठवणीत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
बोनी कपूर यांनी श्रीदेवींचा एक फोटो शेअर केला आहे. 'वाढदिवसाच्या शुभेच्छा जान. तू प्रत्येक क्षणी माझ्यासोबतच आहेस. आम्हाला मार्ग दाखवत राहा. शेवटपर्यंत तू आमच्यासोबतच राहशील', असे त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

अनिल कपूर यांची पोस्ट -
श्रीदेवी यांच्या आठवणीत अनिल कपूर यांनीही एक पोस्ट शेअर केली आहे.

जान्हवी कपूरची पोस्ट
जान्हवीनेही आपल्या आईच्या आठवणीत एक फोटो शेअर केला आहे.

श्रीदेवी यांनी वयाच्या अवघ्या ४ थ्या वर्षीच अभिनयात पदार्पण केलं होतं. १९७६ ते १९८२ च्या कालावधीमध्ये त्यांनी बरेच तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. रजनीकांत, कमल हसन यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबतही त्यांनी चित्रपट साकारले. बॉलिवूडमध्ये देखील त्यांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली.

ABOUT THE AUTHOR

...view details