महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'जेम्स बॉण्ड'चा २५ वा चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित - hollywood

'जेम्स बॉण्ड' चित्रपटाच्या २५ व्या भागात डॅनियल क्रेग हा 'जेम्स बॉण्ड'च्या भूमिकेत दिसणार आहे. डॅनियल तब्बल पाचव्यांदा 'एजंट ००७' च्या रूपात दिसणार आहे.

'जेम्स बॉण्ड'चा २५ वा चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित

By

Published : Apr 27, 2019, 10:13 AM IST

'जेम्स बॉण्ड' ही चाहत्यांमधील सर्वात लोकप्रिय व्यक्तिरेखा आहे. 'बॉण्ड' या सिरिजमधील २५ वा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २८ एप्रिलपासून जमायका येथे या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरवरून याबद्दल माहिती दिली.

'जेम्स बॉण्ड' चित्रपटाच्या २५ व्या भागात डॅनियल क्रेग हा 'जेम्स बॉण्ड'च्या भूमिकेत दिसणार आहे. डॅनियल तब्बल पाचव्यांदा 'एजंट ००७' च्या रूपात दिसणार आहे. या भूमिकेसाठी त्याला तब्बल ४५० कोटीचे मानधन मिळाले असल्याचे बोलले जात आहे. तो २००६ पासून 'जेम्स बॉण्ड'ची भूमिका साकारत आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात रमी मलेक ही देखील झळकणार आहे.

या चित्रपटाचे शूटिंग जपान आणि दक्षिण फ्रान्समध्ये होणार आहे. चित्रपटाची कथा रेमंड बेन्सन यांच्या 'नेव्हर ड्रिम्स ऑफ डाईंग' या कादंबरीकर आधारित आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा कॅरी जोजी फुफुनागा सांभाळणार आहेत.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details