फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात ८ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी हा आठवडा 'व्हॅलेंटाईन विक' म्हणून तरुणाईत प्रिय आहे. या आठवड्यातील प्रत्येक दिवशी वेगवेगळा 'डे' साजरा केला जातो. तरुणाईत या आठवड्याचे विशेष आकर्षण असते. बॉलिवूडच्या चित्रपटांमध्येही अनेक रोमॅन्टिक गाणी तयार करण्यात आली आहेत.
बॉलिवूडच्या 'या' रोमॅन्टिक गाण्यांनी साजरा करा तुमचा 'प्रॉमिस डे'! - प्रॉमिस डे
'प्रॉमिस डे'साठी खास गाणी तुमच्यासाठी...
आज 'प्रॉमिस डे' म्हणजे एकमेकांना काहीतरी वचन देऊन नाते अधिक दृढ बनविण्याचा प्रयत्न केला जातो. सुरुवातीला एकमेकांप्रती असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी पत्रांद्वारे काहीतरी संदेश पाठविला जात असे. आता चित्रपटांमध्ये गाण्यांद्वारे आपल्या मनातील भाव व्यक्त केले जातात. बॉलिवूडमध्येही या गाण्यांची क्रेझ आजतागायत पाहायला मिळते. प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या ह्रदयाला भिडतील, अशी ही काही गाणी तुमचाही 'प्रॉमिस डे' खास पद्धतीने साजरा करण्यासाठी उपयोगी ठरतील.
'प्रॉमिस डे'साठी खास गाणी-
- वादा रहा प्यार से प्यार का
- वादा करो नही छोडोगे मेरा साथ
- जो वादा किया वो निभाना पडेगा
- तु तु है वही दिल ने जिसे अपना कहा
- वादा न तोड