महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

बॉलिवूड सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क

आमिर खान, किरण राव, लारा दत्ता, महेश भूपती, रितेश देशमुख, जेनेलिया, विशाखा सुभेदार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

बॉलिवूड सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क

By

Published : Oct 21, 2019, 12:02 PM IST

Updated : Oct 21, 2019, 4:58 PM IST

मुंबई -सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. त्यामुळे बॉलिवूड सेलिब्रिटींनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.

आमिर खान

अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी मुंबईत वांद्रे येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. राज्यापुढील समस्या जो पक्ष सोडवू शकेल, त्याला मतदान केलं असल्याचं आमिरनं यावेळी सांगितलं. तर, किरण रावनेही शेती, पाणी आणि इतर समस्या जो पक्ष सोडवू शकेल, त्याला मतदान केलं असल्याचं सांगितलं.

गोविंदा

हेही वाचा -बाभळगावत देशमुख कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क, रितेश - जेनेलिया ठरले आकर्षण

अभिनेत्री लारा दत्ता हिने पती टेनिसपटू महेश भूपती याच्यासोबत मतदानाचा हक्क बजावला. इतरांनाही तिने मतदान करण्याचं आवाहन यावेळी केलं.

अभिनेता रितेश देशमुख यानेही लातुरातील बाभळगाव येथे मतदान केलं. यावेळी त्याच्यासोबत पत्नी जेनेलियासह संपूर्ण कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

अभिनेत्री विशाखा सुभेदार आपल्या कुटुंबासह अंबरनाथ शहरातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला

हेही वाचा -अभिनेते उदय सबनीस यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क, मुलगी समीहाचं पहिलंच मतदान

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा आणि दिग्दर्शक- गीतकार गुलजार यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.

अभिनेत्री माधुरी दीक्षितनेही आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडले. वांद्रे येथील मतदान केंद्रावर तिने मतदान केलं.

अभिनेता गोविंदानेही पत्नी सुनीतासोबत मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं.

भाजपच्या खासदार अभिनेत्री हेमा मालिनी यांनी अंधेरी( पश्चिम) येथील मतदान केंद्रावर मतदान केलं आहे.

मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार आपल्या कुटुंबासह अंबरनाथ शहरातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. इतरांनी देखील मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

मराठी अभिनेता मिलिंद गुणाजी यांची मुंबईतील वांद्रे परिसरात आपल्या पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला.

Last Updated : Oct 21, 2019, 4:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details