महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 15, 2019, 3:57 PM IST

ETV Bharat / sitara

इंडिया फिल्म प्रोजेक्ट २०१९: बॉलिवूड कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज

राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, राधिका मदन, जिम सर्भ, किर्ती कुल्हारी आणि गुलशन देवैय्या यांसारख्या कलाकारांनी या सोहळ्यात हजेरी लावली होती. त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दितील काही अनुभव शेअर केले.

इंडिया फिल्म प्रोजेक्ट २०१९: बॉलिवूड कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज

मुंबई - 'इंडिया फिल्म प्रोजेक्ट' (कंटेट क्रिऐशन फेस्टिव्हल) १२ आणि १३ ऑक्टोंबरला आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती. यामध्ये राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, राधिका मदन, जिम सर्भ, किर्ती कुल्हारी आणि गुलशन देवैय्या यांचाही सहभाग होता. या कार्यक्रमात कलाकारांनी आपल्या सिनेकारकिर्दितील काही अनुभव शेअर केले.

माध्यमांशी बोलत असताना अभिनेत्री राधिका मदनने तिच्या चित्रपटांविषयी काही किस्से सांगितले. तिचा काही महिन्यांपूर्वीच 'मर्द को दर्द नही होता' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

हेही वाचा -‘जेव्हा सैराटला भेटते धडक’

या चित्रपटातील तिचा सहकलाकार अभिनेता गुलशन देवैय्या हा देखील उपस्थित होता. त्यानेही आपल्या आगामी 'कमांडो ३' चित्रपटाबद्दल माहिती दिली. या चित्रपटाबद्दल फार अपेक्षा असल्याचंही तो यावेळी म्हणाला.

अभिनेत्री किर्ती कुल्हारीनेही तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल माहिती दिली.

हेही वाचा -अरुण खेत्रपाल यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारणार वरुण धवन

अभिनेता राजकुमार रावही सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. लवकरच तो 'मेड इन चायना' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनमधून वेळ काढुन त्याने या फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती. त्यानेही माध्यमांशी खास संवाद साधला.

इंडिया फिल्म प्रोजेक्ट २०१९: बॉलिवूड कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज

हेही वाचा -विद्युत जामवालच्या 'खुदाहाफीज'च्या शूटींगला उझबेकीस्तानमध्ये सुरूवात

ABOUT THE AUTHOR

...view details