महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

चाहत्यांचं प्रेम पाहुन भारावले 'बिग बी', सोशल मीडियावर मानले आभार - अमिताभ बच्चन वाढदिवस

सोशल मीडियाद्वारे चाहत्यांनी दिलेलं अफाट प्रेम पाहुन बिग बी भारावले आहेत. त्यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आपल्या सर्व चाहत्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

चाहत्यांचं प्रेम पाहुन भारावले 'बिग बी', सोशल मीडियावर मानले आभार

By

Published : Oct 11, 2019, 12:54 PM IST

मुंबई - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज ७७ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सिनेसृष्टीवर वर्षानुवर्षापासून अधिराज्य गाजवणाऱ्या बिग बींची क्रेझ चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. त्यांचं भारदस्त व्यक्तिमत्व, सहजसुंदर अभिनय, अमोघ भाषाशैली या सर्वांचीच चाहत्यांवर भूरळ आहे. त्यामुळेच आजही बॉलिवूडच्या इतर कलाकारांमध्ये अमिताभ बच्चन यांचं नाव अग्रस्थानी असल्याचं पाहायला मिळतं.

सोशल मीडियाद्वारे चाहत्यांनी दिलेलं अफाट प्रेम पाहुन बिग बी भारावले आहेत. त्यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आपल्या सर्व चाहत्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

हेही वाचा -७७ व्या वयात पदार्पण करताना बिग बींनी सांगितली अपुरी स्वप्नं

'तुम्ही सर्व माझ्या हृदयात राहता. तुम्हा सर्वांना अनेक अनेक धन्यवाद', असं बिग बींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे.

आपल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनबाबत त्यांनी अलिकडेच सांगितलं की, ते कधीही त्यांचा वाढदिवस साजरा करत नाहीत. आपल्या इतर दिवसांप्रमाणेच वाढदिवसाचा दिवसही असतो. त्यामुळे वाढदिवस साजरा करण्याची गरज नाही. माझं शरीर अजुनही काम करण्यासाठी साथ देत आहे, त्यामुळे मी अजुनही चित्रपटांमध्ये काम करतो, असेही ते म्हणाले.

हेही वाचा -अमिताभ बच्चन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव... पाहा, बिग बींच्या गाजलेल्या ५० भूमिकांचा कोलाज

बिग बींच्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूड कलाकारांनीही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यामध्ये माधुरी दिक्षीत, परिनीती चोप्रा, करण जोहर, फराह खान, अजय देवगन, नेहा धुपिया, फरहान अख्तर, कुणाल कोहली, दिव्या दत्ता, आफताब शिवदासनी, दिया मिर्झा, या सर्वांनी सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details