मुंबई -अभिनेत्री भूमी पेडणेकर बऱ्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'दम लगाके हैशा', 'शुभमंगल सावधान', 'टॉयलेट-एक प्रेमकथा' यांसारख्या चित्रपटातून तिने आपल्या अभिनयाची दमदार छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. लवकरच ती विकी कौशलसोबत 'भूत' चित्रपटात झळकणार आहे. मात्र, या चित्रपटात तिची फारच कमी भूमिका असणार आहे.
विकी कौशलच्या 'भूत' चित्रपटात भूमीची फक्त इतक्याच मिनीटांची भूमिका - sonchiriya
यावर्षी भूमी बऱ्याच चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. काही महिन्यांपूर्वीच सुशांत सिंग राजपूतसोबत तिने 'सोनचिरीयां' चित्रपटात भुमिका साकारली होती. या चित्रपटानंतर 'डॉली किट्टी और चमकते सितारे', अमर कौशिक यांचा 'बाला' आणि तुषार हिरानंदानीच्या 'सांड की आँख' या चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

काही दिवसांपूर्वीच करण जोहर आणि शशांक खेतान यांनी त्यांच्या आगामी हॉरर असलेल्या 'भूत' चित्रपटाची घोषणा केली होती. यामध्ये विकी कौशल हा थरारक भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच भूमीचा कॉमियो रोल असणार आहे. त्यामुळे तिची भूमिका अवघ्या ७ मिनीटांची असणार आहे. त्यामुळे तिला फार कमी वेळ या चित्रपटात पाहता येईल. भूमीची कमी भूमिका असल्याने ती चित्रपटाच्या कोणत्याही प्रमोशनमध्ये सहभागी राहणार नाही.