मुंबई : सुहाना, अनन्या आणि शनाया या लहानपणापासून चांगल्या मैत्रिणी आहे. सुहाना खान ( Suhana Khan ), अनन्या पांडे ( Ananya Panday ) आणि शनाया कपूर ( Shanaya Kapoor ) हे काल पार्टीसाठी जाताना दिसले. शनिवारी रात्री हे स्टार किड्स नाईट आऊटसाठी बाहेर पडले.
सुहानाने स्ट्रीप ट्राउझर्सच्या जोडीसह पांढरा ऑफ-शोल्डर टॉप घातला. तिने हूप इअररिंग्सनचा लूक केला होता. लॅव्हेंडर रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये अनन्या अतिशय सुंदर दिसत होती, तर शनायाने कंबरेवर कट-आउट असलेला पांढरा ड्रेस घातला होता. अनन्याने शनायाचा ड्रेस घातला होता. "शनायाचे कपडे चोरणे हा माझा छंद आहे," अशी कॅप्शन देत तिने पोस्ट केली आहे.
खुशी कपूर दिसली बॉयफ्रेंडसोबत
दरम्यान, खुशी कपूरही शनाया, सुहाना आणि अनन्यासोबत डिनर डेटसाठी सामील झाली होती. तिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंड आकाश मेहताही ( boyfriend Aakash Mehta ) होता. सुहाना, अनन्या आणि शनाया या अभिनेता शाहरुख खान ( Shah Rukh Khan ), चंकी पांडे ( Chunky Panday ) आणि संजय कपूर ( Sanjay Kapoor ) यांच्या मुली आहेत. अनन्या प्रमाणेच सुहाना आणि शनाया देखील अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी उत्सुक आहेत. शनाया करण जोहरच्या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे, तर सुहाना झोया अख्तरच्या आर्चीज कॉमिक्सच्या भारतीय रिमेकमध्ये दिसेल.
हेही वाचा -Farhan Shibani Photo : आलिंगन देत फरहान शिबानीने शेअर केले लग्नातील सदाबहार फोटो